देवगिरीवरील CCTV फुटेज न मिळण्यावरून अमोल मिटकरींचा संताप, अजितदादांच्या मृत्यूच्या CBI चौकशीची मागणी

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संदिग्ध विमान अपघातावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्याच महायुती सरकारला घरचा आहेर दिला आहे.

Published On: 

Amol Mitkari demanding CBI inquiry in Ajit Pawar death case

प्रतिनिधी, 11 नोव्हेंबर: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी महायुती सरकारला घरचा आहेर दिला आहे. या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा असलेले देवगिरी निवासस्थानावरील सीसीटीव्ही फुटेज शोधू न शकणारे सरकार ‘निरुपयोगी’ असल्याची जोरदार टीका त्यांनी केली आहे. तसेच, मृत्यूला नऊ महिने उलटूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी का केली नाही, असा सवाल त्यांनी विचारला आहे.

म्हैसपूर येथील स्वतःच्या शेतात आयोजित करण्यात आलेल्या ‘बळी महोत्सव’ या कार्यक्रमात शेतकऱ्यांसमोर बोलताना मिटकरी यांनी हे गंभीर आरोप केले. अजितदादांचे मित्र म्हणवून घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर त्यांनी थेट निशाणा साधला. यासोबतच अजित पवारांचा अपघात नसून घातपात झाल्याच्या दाव्याचा त्यांनी पुन्हा एकदा पुनरुच्चार केला.

मृत्यूबाबत संशय व्यक्त करताना मिटकरी यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. आदल्या दिवशी रस्ते मार्गाने जाण्याचे निश्चित झालेले असताना, अजित पवारांना तो निर्णय ऐनवेळी बदलायला लावणारे कोण होते? शेवटच्या क्षणी विमान प्रवासाचा सल्ला कोणी दिला? तसेच विमानाचे पायलट आणि ‘क्रू मेंबर्स’ बदलवणारे कोण आहेत, असे सवाल त्यांनी केले.

दरम्यान, आगामी ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल’ या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला आपण काही पुरावे दिल्याचेही माजी आमदार मिटकरी यांनी म्हटले आहे. अजितदादांच्या मृत्यूपूर्वी आणि मृत्यूनंतर अघोरी पूजा करणाऱ्यांसंदर्भात हे पुरावे आहेत. खरातच्या आश्रमात स्वतःच्या करंगळ्या कापणारे लोक कोण होते, याचा शोध घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. मिटकरी यांनी स्वपक्षीयांच्या सरकारवर केलेल्या या कठोर टीकेमुळे महायुतीतील घटक पक्षांमध्ये तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही