🕒 1 min read
Amol Mitkari | बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावच्या सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे अपहरण करून हत्या प्रकरणाचा ठपका असलेला वाल्मिक कराड (Walmik karad) 31 डिसेंबर रोजी पुण्यात सीआयडीला शरण गेला. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले (Sudharshan Ghule) याच्यासह सुधीर सांगळेला (Sudhir Sangle) पुण्यातून ताब्यात घेण्यात आले आहे.
दरम्यान या प्रकरणावरून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी ( Amol Mitkari ) यांनी एक ट्वीट करत शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणे यांच्यावर सडकून टीका केली आहे. अमोल मिटकरी यांनी एक फोटो शेअर करत बजरंग सोनावणे यांना डिवचलं आहे.
अमोल मिटकरींनी जो फोटो शेअर केला त्यामध्ये बजरंग सोनावणे यांच्यासोबत वाल्मिक कराड बसल्याचे पाहायला मिळत आहे. इतकंच नाहीतर या फोटो सोबत अमोल मिटकरी यांनी लई अवघड हाय गड्या उमगाया “बाप्पा “रं…. असं कॅप्शन दिलं आहे. यामुळे आता अनेक चर्चांना उधाण आलं असून यावर बजरंग सोनावणे काही प्रत्युत्तर देतात का?, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Manoj Jarange Patil | “…तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही”; मनोज जरांगे पाटलांचा थेट इशारा
- Devendra Fadanvis | उद्धव ठाकरे, संजय राऊत, सुप्रिया सुळेंकडून फडणवीसांचं कौतूक, भविष्यातील संकेत काय?
- Walmik Karad ने वापरलेल्या गाडीमालकाकडून स्पष्टीकरण; म्हणाले, “अजितदादांच्या दौऱ्यात मी होतो, पण..’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










