Devendra Fadanvis | महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या तीन-चार वर्षांपासून अनेक घडामोडी घडल्या. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टोकाचे आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळाले. नव्याने स्थापन झालेल्या सरकारवर टीका करण्याची एकही संधी विरोधक सोडत नाहीयेत. मात्र अशातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांच्यावर अचानक विरोधकांकडून कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे .
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं कौतूक सामनातून तर झालंच, त्यानंतर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनीही फडणवीस यांचे कौतूक केले. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही फडणवीस यांच्या कामांची स्तुती केली आहे. महाराष्ट्रातील बदललेले राजकारण भविष्यात कोणत्या दिशेने जाणार त्याचे संकेत मिळत आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला गडचिरोली दौरा केला. नक्षलप्रभावग्रस्त या भागात फडणवीस यांनी दौरा करुन एक आदर्श निर्माण केल्याचे सामनामध्ये म्हटले. तर सुप्रिया सुळे म्हंटल्या की, महाराष्ट्र सरकारमध्ये कोणी चांगले काम करत असेल तर त्यात फक्त देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेता येईल. विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या कौतुकावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया देत आभार मानले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Walmik Karad ने वापरलेल्या गाडीमालकाकडून स्पष्टीकरण; म्हणाले, “अजितदादांच्या दौऱ्यात मी होतो, पण..’
- Maharashtra Politics । महायुतीतील वाद चव्हाट्यावर? भाजपनंतर शिंदे गटाच्या ‘या’ दिग्गज नेत्याने मागितला मुंडे बंधु-भगिनींचा राजीनामा
- Manoj Jarange Patil | “यांच्या बापाचा बाप आला, तरी आम्ही…”; संतोष देशमुख हत्येप्रकरणी मनोज जरांगे आक्रमक