Maharashtra Politics । जरी भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांची युती असली तरी मागील काही दिवसांपासून युतीमध्ये काहीतरी आलबेल असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. याला कारण आहे ते म्हणजे बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्याप्रकरण (Santosh Deshmukh murder case). या प्रकरणामुळे अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी महायुतीतील नेते करत आहेत.
भाजप आमदार सुरेश धस यांच्यानंतर आता शिंदे गटातून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. इतकेच नाही तर या नेत्याने मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे. यावरून महायुतीमध्ये काहीतरी बिनसलं आहे, अशा चर्चा दबक्या आवाजात सुरु आहेत.
ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनी मुंडे बंधु-भगिनींचा राजीनामा मागितला आहे. बीडच्या घटनेनंतर बंधु-भगिनींनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा. मी गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत काम केलं असून जर त्यांना हवं असतं, तर ते अनेक वाल्मिक कराड निर्माण करू शकले असते. पण गोपीनाथ मुंडे असे नेते नव्हते,” असे गजानन किर्तीकर यांनी स्पष्ट केले आहे.
Gajanan Kirtikar on Dhananjay Munde and Pankaja Munde
गजानन किर्तीकर यांच्या मागणीमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे काय उत्तर देतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Manoj Jarange Patil | “यांच्या बापाचा बाप आला, तरी आम्ही…”; संतोष देशमुख हत्येप्रकरणी मनोज जरांगे आक्रमक
- Suresh Dhas । “करुणा मुंडेंच्या वाहनात शस्त्र ठेवणारी ‘ती’ व्यक्ती कोण?”; बड्या नेत्याने केला खळबळजनक खुलासा
- Santosh Deshmukh । संतोष देशमुख यांच्या हत्येमागचा खरा सूत्रधार कोण? ‘या’ आमदारानं थेट नावच सांगून टाकलं आणि ..