Santosh Deshmukh । संतोष देशमुख हत्या प्रकरणी फरार 3 आरोपींपैकी पोलिसांना 2 आरोपींना पकडण्यात यश आले आहे. तर 1 आरोपी अजूनही फरार आहे. डॉ. संभाजी वायबसेच्या कसून चौकशीनंतरच आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला अटक केली आहे.
अशातच आता या प्रकरणी आणखी एक खुलासा समोर येत आहे. शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येमागचा खरा सूत्रधार कोण आहे? त्याचे नाव सांगितले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. “वाल्मिक कराड (Walmik Karad) यांना जे सरंक्षण मिळत आहे ते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) मंत्री असल्याने मिळत आहे. देशमुख यांची हत्या खंडणीमुळे झाली आहे,” असा दावा क्षीरसागर यांनी केला आहे.
या प्रकरणाचा खरा सूत्रधार वाल्मिक कराड असून त्याच या प्रकरणाशी थेट कनेन्शन पाहायला मिळत आहे. जरी मुख्य आरोपींना अटक केली असली तरी कारवाई करण्यास का उशिर होत आहे? असा परखड सवाल देखील क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे. यावर आता धनंजय मुंडे काय उत्तर देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Sandeep Kshirsagar on Santosh Deshmukh murder
दरम्यान, वाल्मिक कराड ज्या गाडीतून पोलिसांना शरण आला त्या गाडीवरून मोठा वाद सुरु आहे. अशातच आता शिवलिंग मोराळे या गाडीमालकाने यावर माध्यमांसमोर येत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “मी वाल्मिक कराड यांचा कार्यकर्ता असून सर्व आरोप खोटे आहेत. मला ज्यावेळी समजले कराड सरेंडर होणार आहेत, त्यावेळी आम्ही पुण्याला गेलो. सीआयडी ऑफिस परिसरात असताना कराड एका छोट्या गाडीत आले होते. त्यांनी मला पाहून हात केला आणि त्यांनी मला माझ्या गाडीत सीआयडी ऑफिसला सोडायला सांगितले. त्यांना सोडून मी निघून आलो.”
महत्त्वाच्या बातम्या :
- Santosh Deshmukh | “आरोपी पुण्यात वीस-पंचवीस दिवस कोणाच्या आश्रयाने राहतात?”; संतोष देशमुख यांच्या भावाचा रोख कुणाकडे?
- Amol Kolhe | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जिरेटोप नम्रपणे नाकारला, यावर अमोल कोल्हे म्हणाले, “ही कृती अतिशय…”
- Santosh Deshmukh हत्येप्रकरणी मोठी अपडेट! वाल्मिक कराडने वापरलेल्या ‘त्या’ गाडीमालकाने सगळं सांगूनच टाकलं