Santosh Deshmukh । बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्याप्रकरण (Santosh Deshmukh murder case) दिवसेंदिवस वेगळे वळण घेत आहे. पोलिसांनी पुण्यात दोन आरोपींना अटक केली आहे. यामुळे तपास आणखी वेगाने होऊ शकतो. याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.
वाल्मिक कराड (Walmik Karad) ज्या गाडीतून पोलिसांना शरण आला त्या गाडीवरून मोठा वाद सुरु आहे. अशातच आता शिवलिंग मोराळे या गाडीमालकाने यावर माध्यमांसमोर येत प्रतिक्रिया दिली आहे. “ज्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीडमध्ये आले त्यावेळी तिथे मी माझ्या कर्मचाऱ्यांना भेटायला गेलो होतो. मी जरी त्यांच्या दौऱ्यात असलो तरी मी तिथे माझ्या मित्राच्या गाडीत गेलो होतो. त्याबाबतचे लोकेशन सादर केले आहे. मी नार्को टेस्ट करायला देखील तयार आहे,” असे शिवलिंग मोराळे म्हणाले आहेत.
Santosh Deshmukh murder case latest update
पुढे ते म्हणाले की, “मी वाल्मिक कराड यांचा कार्यकर्ता असून सर्व आरोप खोटे आहेत. मला ज्यावेळी समजले कराड सरेंडर होणार आहेत, त्यावेळी आम्ही पुण्याला गेलो. सीआयडी ऑफिस परिसरात असताना कराड एका छोट्या गाडीत आले होते. त्यांनी मला पाहून हात केला आणि त्यांनी मला माझ्या गाडीत सीआयडी ऑफिसला सोडायला सांगितले. त्यांना सोडून मी निघून आलो,” असे स्पष्टीकरण मोराळे यांनी दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Sanjay Raut | “संतोष देशमुख हत्याप्रकरणात सुरेश धस फडणवीसांच्या आशिर्वादाशिवाय…”; संजय राऊतांचं वक्तव्य चर्चेत
- Amol Kolhe | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जिरेटोप नम्रपणे नाकारला, यावर अमोल कोल्हे म्हणाले, “ही कृती अतिशय…”
- Santosh Deshmukh । आरोपींना पळून जायला डॉक्टरसह त्याच्या पत्नीनं ‘अशी’ केली मदत, धक्कादायक माहिती आली समोर