Sanjay Raut | बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी (Santosh Deshmukh murder) संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. आता या हत्येप्रकरणी एक मोठी बातमी समोर आली. पुण्यातून पोलिसांनी सुदर्शन घुले (Sudharshan Ghule), सुधीर सांगळे (Sudhir Sangle) या दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
विशेष पोलिस पथकाने गुप्त माहितीच्या आधारावर छापेमारी करून या आरोपींना ताब्यात घेतले असून कृष्णा अंधाळे हा आरोपी अजून फरार आहे. लवकरच या देखील आरोपीला ताब्यात घेतले जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.
याप्रकरणी आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेबद्दल शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी सुरेश धस ( Suresh Dhas ) यांच्यासोबतच देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचायचं असेल तर सुरेश धस पुरेसे आहेत, असं संजय राऊत म्हणालेत.
“सुरेश धस यांना देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद आहे. त्याशिवाय ते बोलणार नाहीत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना बीडमधला दहशतवाद मोडून काढायचा आहे. त्यांनाही बंदुकीचे राज्य संपवायचे आहे. ज्यादिवशी आम्हाला वाटेल की यात पडद्यामागे वेगळं घडतंय, तेव्हा आम्ही पुन्हा एकदा या प्रश्नाला वाचा फोडू”, असे संजय राऊतांनी म्हटले.
महत्वाच्या बातम्या :