Share

Health Tips । सावधान! सतत पोटात दुखत असल्यास चुकूनही करू नका दुर्लक्ष, असू शकतं ‘या’ गंभीर आजाराचं लक्षण

Health tips for Healthy liver. Liver failure has been on the rise for the past few years. Due to wrong eating and drinking habits and poor lifestyle, this rate is seen to increase.

by MHD

Published On: 

Health Tips | Liver Disease symptoms

🕒 1 min read

Health Tips । हल्ली आजारी पडण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. अनेकदा याला आपल्या काही सवयी कारणीभूत ठरतात. विशेष म्हणजे अनेकदा हे आजार जीवघेणे देखील ठरू शकतात. जर तुम्हालाही काही सवयी असतील तर त्या वेळीच बदला नाहीतर तुम्हाला त्याचा मोठा फटका बसू शकतो. (Liver disease)

मागील काही वर्षांपासून यकृत निकामी (Liver failure) होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि खराब जीवनशैली यामुळे हे प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकांना या आजाराबाबत सुरुवातीची लक्षणे माहित नसतात. पण काही लक्षणे दिसली तर त्याकडे आपण दुर्लक्ष करू नये.

डॉक्टरांच्या मतानुसार, सतत पोट दुखणे हे यकृत वाढण्याचे प्रमुख लक्षण आहे. यकृतावर जास्त चरबी जमा होऊ लागल्याचे हे लक्षण असू शकते. हे एक प्राथमिक लक्षण आहे.

Liver Health Tips

सर्वात महत्त्वाचे म्हणजे बऱ्याच प्रकरणांमध्ये, सतत ओटीपोटात दुखणे व्हायरल हिपॅटायटीस संसर्गामुळे होते. या संसर्गामुळे थोड्या काळासाठी ओटीपोटात दुखणे तसेच ताप किंवा मळमळ होऊ शकते. सतत ओटीपोटात दुखणे हे यकृतात जळजळ किंवा दुखापतीचे लक्षण असण्याची शक्यता असते. अशावेळी जर सतत पोटदुखीची समस्या असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप गरजेचे आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
by MHD

🕘 संबंधित बातम्या

⚠️ बातमी पूर्ण दिसत नाहीये?

चांगल्या अनुभवासाठी Chrome/Safari मध्ये उघडा.

👉 Chrome मध्ये उघडा (Click Here)