Share

Dhananjay Munde यांच्या अडचणी संपता संपेना! पक्षाच्या ‘या’ नेत्यांनी केली राजीनाम्याची मागणी

by MHD
Dhananjay Munde | ncp leader demanded Dhanjay Munde resignation

Dhananjay Munde । मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड (Walmik Karad) याला न्यायालयाने सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. अशातच आता पक्षाच्या एका बड्या नेत्यानेही त्यांचा राजीनामा मागितला आहे.

माहितीनुसार, मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या, अशी मागणी मराठवाड्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी केली आहे. आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. शिवाय पक्षात काही आलबेल आहे का? अशाही चर्चा सुरु आहेत.

Resignation of Dhananjay Munde

दरम्यान, आगामी काळात मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागू नये. ही एकाधिकारशाही मोडीत काढावी, अशी देखील मागणी पक्षाच्या आमदारांनी अजित पवार यांच्याकडे केल्याची माहिती आहे. त्यामुळे अजित पवार कोणता निर्णय घेतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

महत्त्वाच्या बातम्या :

The MLAs of the NCP in Marathwada have demanded the resignation of Dhananjay Munde.

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now