Maharashtra Politics । सत्ताधारी आणि विरोधक सतत कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून एकमेकांवर टीका करत असतात. अनेकदा यामुळे वातावरण तापल्याचे आपल्याला पाहायला मिळते. अशातच आता एका बड्या नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर बोचरी टीका केली आहे.
“राज्य सरकारच्या कॅबिनेटची पहिली बैठक गुरुवारी 2 डिसेंबर रोजी पार पडली. या बैठकीत 2 महत्त्वाचे निर्णयही घेतले राज्यातील सरकारमध्ये मंत्री नावालाच आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे एकटेच सरकार चालवतात,” अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली होती. त्यांच्या टीकेचा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी समाचार घेतला आहे.
Radhakrishna Vikhe Patil on Sharad Pawar and Supriya Sule
तुम्हाला राज्यातल्या जनतेनं नाकारलं आहे, जनाधार नसलेल्यांनी आता घरीच बसावं. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी घरी बसून शेतीबाडी पाहावी, त्यांच्या वांग्याला बरेच पैसे मिळाले आहेत. सुप्रिया सुळेंनी आता राज्यातल्या शेतकऱ्यांना वांग्याच्या शेतीबाबत मार्गदर्शन करावं. कारण वांगी बटाट्याचे पैसे एवढंच त्यांचं काम आहे,” असा टोला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला आहे. यावरून आता पुन्हा एकदा राज्याचे राजकीय वातावरण पेटू शकते, असे बोलले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या :