Santosh Deshmukh । मागील काही दिवसांपासून संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh murder) प्रकरणाने संपूर्ण पोलीस यंत्रणेची झोप उडवली आहे. याप्रकरणी मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) याने पोलिसांना शरण येण्याचा निर्णय घेतला. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
अशातच आता पोलिसांना फरार आरोपींच्या मुसक्या आवळण्यात मोठे यश आले आहे. पुण्यातून पोलिसांनी सुदर्शन घुले (Sudharshan Ghule), सुधीर सांगळे (Sudhir Sangle) या दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. विशेष पोलिस पथकाने गुप्त माहितीच्या आधारावर छापेमारी करून या आरोपींना ताब्यात घेतले असून कृष्णा अंधाळे हा आरोपी अजून फरार आहे. लवकरच या देखील आरोपीला ताब्यात घेतले जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.
दरम्यान, केज पोलिसांनी प्रसिद्धीपत्रक जारी करत सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळेला फरार घोषित करत फरार आरोपींना पकडून देणा-यास पोलिसांनी बक्षीस जाहीर केले होते. अखेर आज पोलिसांना या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात मोठे यश आले आहेत. यामुळे पोलिसांना याप्रकरणाची सखोल चौकशी करता येईल.
Accused arrested in Santosh Deshmukh murder case
तसेच संतोष देशमुख यांची हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली. त्यांची हत्या कोणी केली? या हत्येमागे आणखी कोणाचा हात आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे देखील लवकरच समोर येतील. आरोपींना आता पुढील तपासासाठी सीआयडीच्या ताब्यात दिले जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :