Jitendra Awhad । बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्याप्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्यातील वातावरण चांगलंच तापलेलं आहे. काही दिवसांपूर्वीच अटकेत असलेला वाल्मिक कराड पोलिसांना शरण आला. पण अजूनही काही आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले नाही.
त्या आरोपींना लवकरात लवकर पकडून त्यांना कठोर शिक्षा करा अशी मागणी केली जात आहे. वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला ती गाडी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या ताफ्यातील आहे, असा आरोप काल खासदार बजंरग सोनावणे (Bajrang Sonawane) यांनी केला होता. हाच मुद्दा उचलून धरत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी धक्कादायक दावे केले आहेत.
“ज्या गाडीतून वाल्मिक अण्णा कराड साहेब सीआयडी ऑफिसच्या दारात उतरले आणि ताठ मानेने आत गेले, त्या गाडीचे गुपीत बजरंग अण्णा सोनावणे यांनी आज उघड केले आहे. मा.अजितदादा पवार हे संतोष देशमुख यांच्या गावी गेले होते. त्यावेळी हीच गाडी त्यांच्या ताफ्यात होती. अजितदादा पवार हे काहीच खपवून घेत नाहीत, अशी त्यांची प्रतिमा आहे. मग, त्यांना या गोष्टी कशा खपतात? ” असा परखड सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.
Jitendra Awhad on Ajit Pawar
“उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात जी गाडी होती , तीच गाडी आरोपी पोलिसांसमोर हजर होण्यासाठी वापरतो, हे तर गणित कधीच न सुटण्यासारखेच आहे. महाराष्ट्राची राजकीय गुंडगिरी ही फक्त राजकीय नेतृत्वाने पोसायची, याचा अर्थ स्पष्ट होतो की, महाराष्ट्राला बरबाद करण्याची सुपारी घेण्यासारखेच आहे,” असेही वक्तव्य आव्हाड यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :