Santosh Deshmukh । सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे संपूर्ण राज्याचे लक्ष बीड जिल्ह्याकडे लागले आहे. याप्रकरणी वाल्मिक कराड (Walmik Karad) याने आत्मसमर्पण केले असले तरी अद्यापही काही आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. अशातच आता सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. (Santosh Deshmukh murder case)
केज पोलिसांनी प्रसिद्धीपत्रक जारी करत सुदर्शन घुले (Sudarshan Ghule), कृष्णा आंधळे, सुधीर सांगळेला फरार घोषित केले आहे. बीड जिल्ह्यातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना अजूनही यश का येत नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. पोलिसांची 7 पथकं राज्यासह देशभर सुदर्शन घुलेच्या मागावर असून फरार आरोपींना पकडून देणा-यास पोलिसांनी बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांकडून प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. जर कोणी आरोपीला पकडून दिले योग्य बक्षीस दिलं जाईल. महत्त्वाचे म्हणजे माहिती देणाऱ्याचे नावही गोपनीय ठेवले जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
Who is Sudarshan Ghule?
कोण आहे सुदर्शन घुले?
संतोष देशमुख हत्या प्रकरणापूर्वी अनेक गुन्ह्यांत सुदर्शनचं नाव समोर आले असून तो एक सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर एकूण 10 गुन्हे दाखल आहेत. यात मारहाण आणि अपहरण यांसारख्या गुन्ह्याचा समावेश आहे. पोलिसांना जर सुदर्शन घुलेला पकडण्यात यश आले तर यामागील राजकीय कनेक्शनही उघड होईल.