IND vs AUS । आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024-25 (Border-Gavaskar Trophy 2024-25) मधील शेवटचा कसोटी सामना खेळवला जात आहे. भारतीय संघाला सामन्यांमध्ये अपेक्षित अशी कामगिरी करता आली नाही. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठी संघाला ही कसोटी जिंकणे खूप महत्त्वाचे असणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्यांकडे सर्वांचे लक्ष असेल.
भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) हे चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. भारतीय संघाचे शुभमन गिल (Shubman Gill) आणि विराट कोहलीसह (Virat Kohli) 4 फलंदाज 72 धावांवर माघारी परतले. विराट संयमी खेळ करत होता. पण तो 69 चेंडूंत अवघ्या 17 धावा करून माघारी परतला.
Nana Patekar hunger with Virat Kohli
विराटला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत 5, 100,7, 11, 3, 36, 5 व 17 अशा धावा करता आल्या आहेत. काल नाना पाटेकर यांनी एक विधान केलं होतं. ते म्हणाले होते की, विराट कोहली हा माझा सर्वात आवडता खेळाडू आहे. जर तो लवकर बाद झाला तर मला जेवण घशाखाली जात नाही. जेवण्याची इच्छाच होत नाही.’ त्यामुळे आज नाना पाटेकर यांना उपाशी राहावं लागत की काय अशा चर्चांना सोशल मीडियावर उधाण आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Santosh Deshmukh हत्येप्रकरणी मास्टरमाईंड सुदर्शन घुलेसह दोघे फरार घोषित, माहिती देणाऱ्याला मिळणार मोठं बक्षीस
- Santosh Deshmukh खून प्रकरणाच्या तपासाला येणार गती, बड्या नेत्याने मुख्यमंत्र्यांची भेट घेत केली ‘ही’ मागणी
- Walmik Karad । अजित पवारांच्या ताफ्यातील गाडीतून वाल्मिक कराडनं केलं सरेंडर, बड्या खासदाराने केला गौप्यस्फोट