Santosh Deshmukh खून प्रकरणाच्या तपासाला येणार गती, बड्या नेत्याने मुख्यमंत्र्यांची भेट घेत केली ‘ही’ मागणी

In the case of Sarpanch Santosh Deshmukh murder, a big leader met Chief Minister Devendra Fadnavis and made a big demand.

by MHD

Published On: 

Santosh Deshmukh | Suresh Dhas big demand

Santosh Deshmukh । सरपंच संतोष देशमुख यांचा मारेकरी कोण? याचा उलगडा लवकरच होईल, असे बोलले जात आहे. कारण एका बड्या नेत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेत मोठी मागणी केली आहे.

आमदार सुरेश धस यांनी फडणवीस यांची भेट घेत वकील बदलण्याची मागणी केली. सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांची नियुक्ती करावी. त्यांना सहाय्य करण्यासाठी आधीचे बाळासाहेब कोल्हे यांची निवड केली होती त्यांनाच नियुक्त करण्याची ऑर्डर काढण्याची विनंती केली. दरम्यान, फडणवीस यांनी उज्ज्वल निकम यांना कॉल केला. त्यांची संमती आहे का विचारली. उज्ज्वल निकम साहेबांनी संध्याकाळी बोलतो असे सांगितले.

जरी संतोष देशमुख हत्या प्रकरणी एसआयटी स्थापन झाली असली तरी यातील काही कर्मचाऱ्यांबाबत देशमुख कुटुंबाचा आक्षेप आहे. ही गोष्ट मी मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली आहे. त्यांनी आक्षेप असलेली नावे घेऊन या. त्यातली चार नावे वगळून दुसरी नावे घेऊ असं फडणवीसांनी सांगितले आहे, असे धस यांनी सांगितले आहे.

Suresh Dhas on Santosh Deshmukh murder case

दरम्यान, सुरेश धस यांच्या मागणीबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “सुरेश धस यांनी निवेदन दिल आहे. मी उज्ज्वल निकम यांना विनंती केली. त्यांनी एक दोन दिवस वेळ मागितला असून त्यांनी होकार दिला तर त्यांची नियुक्ती करू.”

महत्त्वाच्या बातम्या :

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
byMHD

Journalist at Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही