Walmik Karad । अजित पवारांच्या ताफ्यातील गाडीतून वाल्मिक कराडनं केलं सरेंडर, बड्या खासदाराने केला गौप्यस्फोट

A senior MP has revealed that the same Scorpio car used by Walmik Karad when he surrendered was in Deputy Chief Minister Ajit Pawar’s fleet.

by MHD

Published On: 

Walmik Karad | bajrang sonawane biggest claim

Walmik Karad । संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणाशी निगडीत असलेल्या वाल्मिक कराड हा पोलिसांना शरण आला. यामुळे तपासाला वेग आला असल्याचे बोलले जात आहे. परंतु एका बड्या खासदाराने वाल्मिक कराडने शरण येतेवेळी जी स्कॉर्पिओ गाडी वापरली तीच गाडी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यात होती, असा गौप्यस्फोट केला आहे.

बजरंग सोनवणे म्हणाले की, “संतोष देशमुख यांना खंडणीच्या प्रकरणामुळे हत्या करण्यात आली आहे. ज्या दिवशी हत्या झाली तेव्हा हा आरोपी परळीत होता. हत्येनंतर आरोपी आणि पोलिसांची भेट झाली. त्यानंतर हा आरोपी एका नेत्याच्या फार्म हाऊसवर भेटून तो शपथविधीला पोहोचतो, तेव्हा अटक का झाली नाही? उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) ज्यावेळी मस्साजोगला आले त्यावेळी त्यांच्या ताफ्यात जी गाडी होती त्याच गाडीतून आरोपीने पुण्यात सरेंडर केलं.” (Bajrang Sonawane)

पुढे ते म्हणाले की, “एसआयटी आणि सीआयडी मुख्यमंत्र्यांनी नेमली आहे. आम्ही विरोधी पक्षातले आहोत म्हणून बोलत आहोत, असं नाही. त्यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांच्याही पक्षातून होत आहे. विशेष म्हणजे त्यांच्या समाजाचे इतर नेते मंत्रिमंडळात आहेत.”

Bajrang Sonawane on Walmik Karad

दरम्यान, “संतोष देशमुख प्रकरणासोबत माझा काहीही संबंध नाही. त्यामुळे मी राजीनामा का द्यावा? मला विनाकारण लक्ष्य केलं जात आहे. याउलट संतोष देशमुख प्रकरण हे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवलं गेलं पाहिजे अशी मागणी माझीच होती,” असे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी स्पष्ट केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
byMHD

Journalist at Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही