Share

Maharashtra Politics । धनंजय मुंडेंचा पत्ता कट करून भुजबळांना मिळणार मंत्रिमंडळात स्थान? बड्या आमदाराचा दावा

by MHD
Maharashtra Politics | Vijay Vadettiwar big statement

Maharashtra Politics । बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येचा संपूर्ण राज्यातून तीव्र प्रतिसाद उमटत आहे. या प्रकरणात वाल्मिक कराड (Walmik Karad) सीआयडीला शरण आला आहे. त्याच्यावर पवनचक्की प्रकल्पात दोन कोटींच्या खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच याप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना विरोधकांच्या टीकेचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या राजीनाम्याची धरू लागली आहे. अशातच आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी मोठा दावा केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. “बीड जिल्ह्यातील या घटनेवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचं मौन पाहता धनंजय मुंडेंची विकेट काढली जाऊ शकते आणि त्यांच्याऐवजी छगन भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाईल. छगन भुजबळ यांना कदाचित वेट अँड वॉचची भूमिका ठेवावी लागू शकते. नाहीतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे दुसरा पर्याय असेल. कारण भेटीमध्ये काहीतरी ठरलं असेल,” असे वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

Vijay Vadettiwar on State Government

“मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काऊटर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे माझी पोलिसांना विनंती आहे की त्याचा एन्काऊंटर करु नका. जर असे झाले तर पुरावे नष्ट होऊ शकतात,” असेही भाष्य विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Maharashtra Politics, Dhananjay Munde is facing criticism from his opponents in the Santosh Deshmukh murder case. His resignation has started. Similarly, now Congress leader Vijay Wadettiwar has made a big claim.

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now