🕒 1 min read
Sanjay Raut । बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावातील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येवरून राज्य सरकाराला विरोधकांनी चांगलेच धारेवर धरले आहे. यामुळे आपल्याला राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले असल्याचे पाहायला मिळत आहे. यावरुन आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
“देवेंद्र फडणवीसांनी किती जणांचे रक्ताचे डाग धुवून त्यांना सरकारमध्ये घेतलं आहे? त्यांनी किती जणांचे आक्रोश, किंकाळ्या दाबल्या आहेत? याबाबत देवेंद्र फडणवीसांनी एसआयटी स्थापन करावी. महाराष्ट्र राज्याची बदनामी म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची बदनामी होय. एक वाल्मिक कराडला अटक केली. पण बीडमध्ये हा खटला चालवू नये. कारण हा इतका गंभीर विषय आहे की हा खटला बीडच्या बाहेर चालावा,” अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.
Sanjay Raut criticized Devendra Fadnavis
पुढे राऊत म्हणाले की, “आपल्या सरकारला खून पचवायची सवय आहे. बीडचे आका, त्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह असणारे फोटो. त्यांचा वावर, त्यांचा मंत्र्यांशी असणारा संवाद हे पाहिल्यानंतर लोकांच्या मनात शंका येते आहे की खरंच न्याय मिळेल का?” असा सवाल त्यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- “… तर Walmik Karad चा एन्काऊंटर होईल”; बड्या नेत्याच्या दाव्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ
- Santosh Deshmukh यांचा भाऊ अचानक वाल्मिक कराड कस्टडीत असलेल्या पोलीस ठाण्यात पोहोचले अन झालं असं काही की..
- राज्य सरकारच्या निर्णयामुळे Santosh Deshmukh हत्या प्रकरणाला वेगळे वळण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










