Santosh Deshmukh । मागील काही दिवसांपासून संतोष देशमुख हत्याप्रकरण (Santosh Deshmukh Murder Case) चांगलंच चर्चेस येत आहे. याप्रकरणी दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. अशातच आता एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या केली असल्याचा ठपका वाल्मिक कराडवर (Walmik Karad) ठेवला जात आहे. विशेष म्हणजे त्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण देखील केले आहे. न्यायालयाने त्याला 14 दिवसांची कोठडी सुनावली असून सध्या त्याची सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कसून चौकशी सुरु केली जात आहे. पण अचानक वाल्मिक कराड कस्टडीत असलेल्या बीड पोलीस ठाण्यात संतोष देशमुख यांचे भाऊ पोहोचले.
त्यांनी तेथे काहीवेळ थांबून अधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि त्यानंतर ते बाहेर पडले. पोलीस ठाण्यातून बाहेर पडताच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. “तपास कुठपर्यंत आला आहे याची माहिती घेण्यासाठी मी सीआयडी कार्यालयात आलो होतो. मी काही मदत करु शकतो का? असेही मी सीआयडीच्या अधिकाऱ्यांना विचारले आहे,” अशी माहिती धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी दिली.
Santosh Deshmukh Murder Case
दरम्यान, धनंजय देशमुख यांनी अचानक पोलीस स्टेशनला भेट दिल्याने चर्चांना उधाण आले होते. पण त्यांनी माध्यमांशी संवाद साधल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. वाल्मिक कराडला अटक केल्यांनतर या प्रकरणाला वेगळे वळण आले असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
‘कोण आफ्रिदी? कोणत्या जोकरचं नाव घेता…’, शाहिद आफ्रिदीचं नाव घेताच असदुद्दीन ओवैसी भडकले