Share

‘धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही तर सुरुवात’; सोनम वांगचुक यांचे मोठे विधान

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर संसदेत सादर झालेल्या सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयकाचे सोनम वांगचुक यांनी स्वागत करत हा केवळ मोठ्या बदलाची सुरुवात असल्याचे म्हटले.

Published On: 

Sonam Wangchuk

दिल्ली : माजी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि संसदेत मांडण्यात आलेले ‘सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक’ (Public Examination Reform Bill) यांवर सोनम वांगचुक  (Sonam Wangchuk) यांनी आपली प्रतिक्रिया दिली. प्रधान यांचा राजीनामा ही एका महत्त्वपूर्ण बदलाची केवळ सुरुवात आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. सोमवारी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर, वांगचुक यांनी थेट दिल्लीतील राजघाट गाठून महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी गीतांजली अंगमो होत्या.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना वांगचुक म्हणाले, “हा राजीनामा म्हणजे केवळ सुरुवात आहे. जर या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन भविष्यात योग्य पावले उचलली गेली, तर आपला देश अधिक चांगला बनेल. माझ्या मते, ही प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे. सध्या सकारात्मक चर्चा सुरू आहेत आणि मला आशा आहे की देशासाठी सर्वात योग्य आणि उत्कृष्ट अशी प्रणाली अंमलात आणली जाईल.”

परीक्षा सुधारणा विधेयकाचे स्वागत

संसदेत मांडण्यात आलेल्या सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयकावर भाष्य करताना वांगचुक म्हणाले, “ही एक अत्यंत सकारात्मक बाब आहे. या विषयावर संसदेत सखोल चर्चा झाली पाहिजे आणि त्यानंतरच योग्य उपाययोजना स्वीकारल्या गेल्या पाहिजेत.”

“शांततापूर्ण आंदोलन हा घटनात्मक अधिकार”

विद्यार्थ्यांच्या आंदोलनांवरील पोलीस कारवाईबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जाऊ नये. शांततापूर्ण आंदोलन करणे हा आपला घटनात्मक अधिकार आहे आणि त्याचा पूर्ण आदर केला गेला पाहिजे. मात्र,” वांगचुक पुढे म्हणाले, “जर लोक दुर्भावनापूर्ण हेतूने एकत्र आले असतील, तर त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई केली जाईल.”

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही