Ajit Pawar | शरद पवारांना भेटून लोटांगण घालून पाया पडणार; अजित पवार गटाच्या नेत्याचे मोठं विधान

“शरद पवारांना सोडून अजित पवारांबरोबर गेल्यापासून आजपर्यंत शरद पवारांची भेट घेतली नाही. पण आता शरद पवारांना भेटून लोटांगण घालून पाया पडणार आहे”, असं नरहरी झिरवाळ यांनी म्हटलं आहे.

Published On: 

sharad pawar ajit pawar

Ajit Pawar | नुकतंच राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटपानंतर काही मंत्र्यांनी अजूनही आपल्या पदाचा पदभार स्वीकारलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते तथा मंत्री नरहरी झिरवाळ यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. यानंतर बोलताना मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केलेलं एक विधान चांगलंच चर्चेत आलं आहे.

“शरद पवारांना सोडून अजित पवारांबरोबर गेल्यापासून आजपर्यंत शरद पवारांची भेट घेतली नाही. पण आता शरद पवारांना भेटून लोटांगण घालून पाया पडणार आहे”, असं नरहरी झिरवाळ यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानानंतर शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार यांनी पवार कुटुंब पुन्हा एकत्र आलं पाहिजे, असं साकडं पांडुरंगाला घातलं आहे. या पार्श्वभूमीवर नरहरी झिरवाळ बोलताना म्हणाले, “दोन्ही पवार एकत्र आले पाहिजे ही पांडुरंगाला विनंती करतो. राजकारणात काही गोष्ट घडून गेली. आम्ही पवार साहेबांना सोडून गेलो. मात्र लोकांनी आम्हाला निवडून दिलं. तर मी पाडुंरंगाच्या शेजारी पवारसाहेबांना पाहतो.”

महत्वाच्या बातम्या :

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

Journalist at Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही