Ajit Pawar | लोकसभा निवडणूक असो की विधानसभा निवडणूक, बारामतीमधून पवार विरुद्ध पवार, अशी चुरस पाहायला मिळाली. पवार कुटुंबांनी एकत्र यावे यासाठी आता पुन्हा एकदा प्रयत्न सुरू झाले आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अजित पवार यांच्या मातोश्रींनी पांडुरंगाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी सर्व वाद मिटून पवार कुटुंब गुण्यागोविंदानं नांदू दे, असं साकडं विठ्ठलाला घातलं आहे. अशातच आता अजित पवार गटातील नेत्याच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
“जसं बजरंगाच्या छातीत प्रभू राम दिसतील, तर माझ्या छातीत शरद पवार आहेत”, असं वक्तव्य अजित पवार गटातील नेते तथा मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केलं आहे. नरहरी झिरवाळ यांनी अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र यावं, अशीही इच्छा व्यक्त केली आहे.
“शरद पवारांना सोडून अजित पवारांबरोबर गेल्यापासून आजपर्यंत शरद पवारांची भेट घेतली नाही. पण आता शरद पवारांना भेटून लोटांगण घालून पाया पडणार आहे”, असं नरहरी झिरवाळ यांनी म्हटलं आहे.
पुढे ते म्हणाले, “आता राजकारणात काही गोष्टी घडत असतात आणि त्या घडून गेल्या आहेत. आम्ही देखील चूक केली असं म्हणा किंवा बरोबर केलं असंही म्हणता येईल. मात्र, आम्हाला विश्वास होता की आम्ही शरद पवारांना सोडून गेलं तर ते आम्हाला वेगळं समजणार नाहीत, म्हणून आम्ही तो निर्णय घेतला. ”
महत्वाच्या बातम्या :
- IPL 2025 Schedule । अखेर ठरलं! ‘या’ दिवसापासून सुरु होणार IPL चा थरार, जाणून घ्या सर्व माहिती एकाच क्लिकवर…
- “पवार कुटुंबातील वाद मिटून कुटुंब गुण्यागोविंदानं नांदू दे”; Ajit Pawar यांच्या आईचे विठ्ठलाला साकडे
- Nitesh Rane । “केरळ मिनी पाकिस्तान असल्याने प्रियंका गांधी तिथं…”; नितेश राणेंच्या ‘त्या’ वक्तव्याचा केरळच्या मुख्यमंत्र्यांकडून निषेध