Ajit Pawar । लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत बारामतीमधून पवार विरुद्ध पवार असा सामना रंगल्याचे चित्र पाहायला मिळाले. थोरले पवार आणि अजितदादांचे ताणलेले संबंध सर्वांनी जवळून पाहिले. पण 12 डिसेंबर रोजी शरद पवार यांच्या वाढदिवसाला अजितदादांनी जातीने हजर राहत शुभेच्छा दिल्या. तेव्हा दोन पक्ष एकत्र येण्याची चर्चा रंगली. पण या केवळ अफवाच असल्याचे दिसून आले.
अशातच आता अजितदादांच्या आई आशाताई पवार नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पंढरपुरात आल्या. त्यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले. पुजा केली. यावेळी त्यांनी सर्व वाद मिटून पवार कुटुंब गुण्यागोविंदानं नांदू दे, असं साकडं विठ्ठलाला घातलं आहे.
सर्व पवार कुटुंबं एकत्र येऊ देत आणि वाद संपू देत, अशी प्रार्थना विठ्ठलाकडे केली. तसेच राज्यातील जनता सुख-समाधानाने राहू देत, अशीही दोन्ही हात जोडत प्रार्थना केल्याची प्रतिक्रिया आशाताई यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
महत्वाच्या बातम्या :