Manoj Jarange Patil । मस्सोजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder) प्रकरणावरुन राज्याचे वातावरण बदलून गेले आहे. या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) याला न्यायालयाने 15 दिवसांची कोठडी सुनावली आहे. याबाबत आता एक मोठी अपडेट समोर येत आहे.
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. जरी या प्रकरणातील आरोपी वाल्मिकी कराड याला अटक झाली असली तरी अजूनही तीन आरोपी फरार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच या आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही तर मराठे रस्त्यावर येतील,” असा गर्भित इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. (Maratha strike)
Manoj Jarange Patil on Santosh Deshmukh Murder Case
पुढे ते म्हणाले की, “येत्या काही दिवसात मंत्री धनंजय मुंडे यांचा या हत्या प्रकरणात सहभाग आहे की नाही हे समोर येईल. या प्रकरणात मंत्री असो की आमदार असो की आणखी कोणी, कोणालाही सोडायचे नाही. आता चौकशी सुरु झाली आहे. काही आरोपी फरार आहेत. त्यांचे सीडीआर घेतले जातील. कॉल डिटेल्सवरुन सगळे समोर येईल. कोणी खंडणी मागितली, कोणी मागायला लावली? कोणी फोन करायला लावले? आरोपींना सांभाळत कोण हे सगळे चौकशीतून पुढे येईल. या प्रकरणातील आरोपींना मोक्का लागणार आहे. 302 चा गुन्हा लावला जाऊ शकतो. जर सरकारने असे केले नाही तर आम्ही राज्य बंद पाडणार,” असेही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :