Walmik Karad । 9 डिसेंबर रोजी बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची हत्या झाली आणि संपूर्ण राज्याचं रुपडं पालटून गेलं आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या आहेत. या प्रकरणात वाल्मिक कराडचे नाव चर्चेच्या केंद्रस्थानी येत आहे. (Santosh Deshmukh Murder)
वाल्मिक कराडवर खंडणी आणि खूनाचा आरोप असून न्यायालयाने काल त्याला 15 दिवसांची कोठडी सुनावली आहे. त्यानंतर कराडला बीड शहर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवले आहे. याप्रकरणी आता आणखी एक मोठी अपडेट समोर येत आहे. या लॉकअपमध्ये आतापर्यंत चार आरोपी ठेवले होते. यामध्ये विष्णू चाटे हा प्रमुख आरोपी असून त्याच्यावर खून आणि खंडणीचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तसेच जयराम चाटे, प्रतीक घुले आणि केदार हे इतर आरोपी खून आणि इतर गुन्ह्यात सहभागी असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, वाल्मिक कराडला बीड शहर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आल्यानंतर, त्याच्याशी निगडित इतर आरोपींना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले आहे. पोलिसांनी विष्णू चाटे आणि इतर तीन आरोपींना दुसऱ्या पोलीस ठाण्यातील लॉकअपमध्ये पाठवले असल्याची माहिती आता समोर आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :