बीड – जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला (9 डिसेंबर 2024) पाच महिने पूर्ण होण्याच्या आधीच, परळी तालुक्यातील शिवराज दिवटे याच्यावर झालेल्या मारहाणीने पुन्हा एकदा बीड जिल्ह्याचा गुन्हेगारी विषय चर्चेत आणला आहे. शुक्रवारी संध्याकाळी परळीच्या डोंगराळ भागात दहा ते बारा लोकांच्या टोळक्याने शिवराज याला अपहरण करून बांबू व लाकडाने मारहाण केली. मारहाणीच्या वेळी आरोपींनी “तुझा संतोष देशमुख पार्ट-2 करायचा आहे” अशी धमकी दिल्याचेही शिवराजने सांगितले.
सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी जखमी शिवराज याची अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात भेट घेऊन त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली.
Beed Crime Alert: Brutal Beating of Shivraj Divate in Parli
धनंजय देशमुख यांनी सांगितले की, मारहाण करणाऱ्या आरोपींना भविष्याची काळजी नाही आणि त्यांना कुणीतरी प्रशिक्षण देत आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेऊन कठोर कारवाईची मागणी करणार आहेत. त्यांनी आरोप केला की, पोलीस यंत्रणा खालच्या पातळीवर कुचकामी आहे आणि चुकीचे पायंडे थांबवले पाहिजेत.
धनंजय देशमुख म्हणाले, “आरोपींना जातपात धर्माचा आधार नाही, त्यामुळे त्यावर कडक कारवाई होणे आवश्यक आहे. आम्ही शिवराजला भेटलो होतो. त्याला डोक्यावर मार आहे, डोळे लाल आहेत. हाताने बचाव केल्यामुळे तो वाचला. आरोपी मारताना ‘तुझा संतोष देशमुख 2 करू’ असे धमकी देत होते. बीड जिल्ह्यातील या घटना गंभीर असून, जिल्ह्याचे नाव खराब करत आहेत. त्यामुळे पालकमंत्री आणि पोलीस प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्या, अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- IPL 2025: प्लेऑफची आशा टिकवण्यासाठी दिल्लीची गुजरातविरुद्ध परीक्षा
- प्लेऑफ्सची आशा टिकवण्यासाठी पंजाबची आरपारची लढत, राजस्थानसाठी प्रतिष्ठेचा मुकाबला
- कोहलीच्या सन्मानार्थ पांढऱ्या टीशर्टमुळे सामना अडचणीत? चेंडू दिसणार नाही!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












