Dattatray Bharne । नुकतंच राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटपानंतर महायुतीमधील काही नेत्यांना मंत्रिपदाची संधी न मिळाल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा आहे. काही मंत्र्यांनी अजूनही आपल्या पदाचा पदभार स्वीकारलेला नाही. यावर मंत्री दत्तात्रय भरणे ( Dattatray Bharne ) यांनी भाष्य केलं आहे.
ते म्हणाले, “कोणी काहीही म्हणू द्या, पण पुण्याचे पालकमंत्री फक्त अजित पवार च होतील.” दत्तात्रय भरणे यांनीही अजून पदभार स्वीकारलेला नाही. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावर त्यांनी आपण नाराज नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
“पुण्याच्या पालकमंत्री पदासंदर्भात काहीही रस्सीखेच नाही. सर्व तुमच्या मनासारखं होईल. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत योग्य तो निर्णय घेतील. पुण्याच्या पालकमंत्री पदाबाबत कोणी काहीही म्हणू द्या, पण या जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हेच होतील”, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या :