Walmik Karad । मस्साजोगमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली (Santosh Deshmukh Murder Case) आणि राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्याही राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येमागे वाल्मिक कराडचा हात असल्याचा आरोप देखील सातत्याने केला जात आहे.
विशेष म्हणजे वाल्मिक कराडने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यामुळे प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. वाल्मिक कराडने स्वतःहून पोलिसांना जाण्याचा निर्णय घेतला. पुणे पोलिसांनी काल त्याला केज पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याला रात्री उशीरा न्यायालयात हजर करण्यात आलं. पण यावेळी न्यायालयात काही नाट्यमय घडामोडी घडल्या. सुनावणीला अवघे काही क्षण सुरु असताना वैयक्तिक कारणास्तव सरकारी वकील एस. एस. देशपांडे यांनी या प्रकरणी अन्य वकील नेमावा असं कोर्टाकडे पत्र दिलं. याप्रकरणी जे. बी. शिंदे सरकारी वकील म्हणून युक्तिवाद केला.
दरम्यान, सुनावणीवेळी जे. बी. शिंदे यांनी वाल्मिक कराडला 15 दिवसांची पोलीस कोठडी देण्याचा युक्तिवाद केला. तर वाल्मिक कराड सीआयडीला शरण आले असल्याने त्यांना जामीन मिळायला हवा, असा युक्तिवाद कराडचे वकील अशोक कवडे यांनी केला. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने कराडला 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्याचा निर्णय घेतला आहे.
Court has given a big blow to Walmik Karad
तसेच या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले हा वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून काम करत होता. न्यायालयात सरकारी पक्षानं १९९९ सालापासून वाल्मिक कराडचं नाव आलेल्या गुन्ह्यांची यादीच न्यायालयासमोर सादर केली. अशा कृत्यांमधून तो दहशत पसरवत होता, असा देखील युक्तिवाद सरकारी वकिलांनी न्यायालयात केला.
महत्त्वाच्या बातम्या :