Walmik Karad । सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येप्रकरणी राज्याच्या राजकीय वर्तुळाने वेगळे वळण घेतले आहे. अखेर वाल्मिक कराड हे स्वत:हून पुण्यातील सीआयडी कार्यालयात हजर झाले आणि तपासाला आणखी गती मिळाली आहे.
वाल्मिक कराड यांना सीआयडीच्या पथकाने ताब्यात घेतल्यानंतर याबाबत सीआयडी अधिकारी सारंग आवाड (Sarang Awad) यांनी माहिती दिली. केज पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांची जुजबी चौकशी केल्यानंतर त्यांना टीमसह ताब्यात देण्यासाठी बीडला रवाना केलं आहे, अशी माहिती सारंग आवाड यांनी सांगितलं.
या प्रकरणाचा तपास सीआयडीचे डीवायएसपी करत असून या गुन्ह्याच्या तपासासाठी वाल्मिक कराडला त्यांच्या ताब्यात देणार असल्याचं देखील सारंग आवाड यांनी सांगितलं आहे. यावेळी सीआयडी अधिकाऱ्यांना वाल्मीक कराड इतके दिवस कुठे होता? तो कुठून आला याबद्दल विचारण्यात आले. पण सीआयडी अधिकाऱ्यांनी यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही.
Santosh Deshmukh Murder Case
दरम्यान, संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप होत असलेला वाल्मिक कराड (Walmik Karad) याला पुण्यामध्ये CID पथकाने ताब्यात घेतले आहे. सीआयडीच्या पथकाने ही कारवाई केल्याची माहिती आहे. काल (30 डिसेंबर 2024) रोजी ‘महाराष्ट्र देशा’ वेबपोर्टलने या संदर्भात वृत्त प्रकाशित केले होते. ‘महाराष्ट्र देशा’ च्या बातमीवर शिक्कामोर्तब झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :