Suresh Dhas । सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरण महाराष्ट्रात चांगलंच गाजलं आहे. याप्रकरणी आरोप झालेला आणि पवनचक्की खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड सीआयडीला शरण आल्यानंतर तपासाला गती येईल, असे बोलले जात आहे. अशातच आता भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी अजब दावा केला आहे.
नुकतीच सुरेश धस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत कराडच्या कारनाम्याचा पाढाच वाचायला सुरुवात केली. बोलताना धस म्हणाले की, या प्रकरणात सुदर्शन घुले हा प्रमुख आरोपी आहे. यात त्याचा आणि प्रतीक घुले या दोघांचा सहभाग जास्त असून वाल्मीक कराड शरण आला आहे. तो 100 टक्के 120 ब मध्ये आहे, पण माझा अंदाज आहे की जर त्यांनी व्हिडिओ पाहिल्यास तर तो पण 302 मध्ये येऊ शकतो,” असा दावा धस यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
पुढे धस म्हणाले की, “ऑक्टोबर 2023 मध्ये पाटोदा तालुक्यामध्ये अशीच एक घटना घडली होती. त्यावेळी एका कंपनीच्या बंडगर नावाच्या अधिकाऱ्याला असेच उचलले होते. त्यावेळी देखील मी सांगितले होते की परळी पॅटर्न आणू नका, खालचा अधिकारी उचलायचा आणि खंडणी मागायची असे प्रकार सुरू होते. असे प्रकार वाढल्याने दोन कोटींची खंडणी मागायची यांची हिम्मत झाली. 50 लाख घेतले आणि राहिलेले दीड कोटी मागायला वाल्मिक कराडनेच माणसं पाठवली होती,” असाही दावा त्यांनी केला.
Santosh Deshmukh Murder Case
मिळालेल्या माहितीनुसार, मस्साजोग मधील पवनचक्की प्रकल्पावरून सुदर्शन घुले हा सतत खंडणी मागत होता. धक्कादायक बाब म्हणजे संतोष देशमुख आणि सुदर्शन घुले यांच्यात झालेल्या वादाचा व्हिडिओ देखील खूप व्हायरल झाला होता. याच रागातून ही हत्या केली असल्याचे बोलले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या :