Supriya Sule । मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठंमोठे भूकंप येत असल्याचे आपण पाहत आहे. संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची चर्चा सध्या सुरु आहे. मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षाकडून जोर धरू लागली आहे.
यावर आता शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यंमत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मैत्रीवरही त्यांनी भाष्य केलं आहे.”मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि अजित पवार त्यांचे मित्र पक्षातील नेते असून नैतिकतेने विचार केला तर ते न्याय देतील. पीडितांना लोकशाहीत न्याय मागण्याचा अधिकार आहे. त्यामुळं थोडा संवेदनशीलपणा सरकारनं त्या कुटुंबीयांसाठी दाखवावा,” असे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे.
पुढे त्या म्हणाल्या की, “जोपर्यंत देशमुख कुटुंबियाला न्याय मिळत नाही तोपर्यंत राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र लढावं. कदाचित त्या पोलीस अधीकक्षाची बदली झाली त्यामागे त्याची चूक नसावी यामागे कोणाचं षडयंत्र आहे? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागल्याने आता अजित पवार कोणता निर्णय घेतात, याकडे विरोधी पक्षासह संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Walmik Karad इतके दिवस कुठे होते? CID अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती
- धक्कादायक । मराठ्यांना खेटायला मोठ्या संख्येने सीआयडी ऑफिस पुणे येथे उपस्थित रहा; वंजारी युवकांना दिला होता संदेश
- Devendra Fadnavis । संतोष देशमुख हत्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या विधानाची चर्चा! म्हणाले, “ते फासावर लटकत नाही…”