Share

गुंडाराजाविरोधात बीडमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवा! अंजली दमानियांची मागणी

Activist Anjali Damania demands ‘Operation Sindoor’ in Beed to crush rising gang violence. Recent brutal attacks spark outrage.

Published On: 

Anjali Damania reveals another case from Beed

🕒 1 min read

बीड | प्रतिनिधी: जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे समाजमन संतप्त झालं असून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट ‘ऑपरेशन सिंदूर’सारखी कारवाई बीडमध्ये राबवण्याची मागणी केली आहे. परळीसारख्या भागात दहशतवादी शैलीत गुंडराज फोफावल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

अलीकडेच बीडमध्ये एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला असून, या घटनेने जिल्ह्यातील भयावह परिस्थिती पुन्हा अधोरेखित केली आहे. स्थानिक गुंडांना राजकीय नेत्यांचे पाठबळ असल्याचा आरोप करण्यात येतो. त्यामुळे पोलीस यंत्रणाही कारवाईस असहाय्य ठरत असल्याचे चित्र आहे.

Anjali Damania Demands Operation Sindoor in Beed

9 डिसेंबर 2024 रोजी मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली होती. या प्रकरणातही सुरुवातीला तपास दाबण्याचा प्रयत्न झाला, मात्र नंतर काही बड्या चेहऱ्यांना तुरुंगात पाठवण्यात आले. तरीही गुन्हेगारीला लगाम बसलेला नाही, असे अनेक प्रकरणांतून दिसून येते.

“सीमेवर ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वीपणे पार पाडलं, तसंच आता बीडमध्येही गुन्हेगारांवर कारवाई करावी,” अशी मागणी दमानियांनी केली आहे. “परळी हा दहशतीचा अड्डा बनला असून, लहान मुलंही मारहाणीत सहभागी होत आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे,” असंही त्यांनी ठामपणे सांगितलं. त्यांच्या या मागणीला सामाजिक स्तरावर अनेकांनी त्यांच्या पाठिंबा दर्शवला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!