Share

मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर

Mumbai Airport and Taj Hotel receive bomb threats via email. The message mentions Afzal Guru and warns of attacks. Security agencies are on high alert.

Published On: 

Mumbai Airport and Taj Hotel receive bomb threats via email. The message mentions Afzal Guru and warns of attacks. Security agencies are on high alert.

🕒 1 min read

मुंबई | प्रतिनिधी: मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ईमेल मिळाल्याने खळबळ उडाली आहे. हा ईमेल थेट मुंबई विमानतळ पोलिसांच्या अधिकृत ईमेल आयडीवर प्राप्त झाला असून त्यात दहशतवादी अफजल गुरु आणि सैवक्कू शंकर यांचा उल्लेख करत हे स्थळ लक्ष्य बनवण्यात येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

या ईमेलनंतर मुंबईतील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून विमानतळ आणि ताज हॉटेल परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. डॉग स्क्वॉडच्या साहाय्याने दोन्ही ठिकाणी तपासणी सुरू असून प्रत्येक कोपऱ्याची झडती घेतली जात आहे. धमकीच्या ईमेलमध्ये अफजल गुरु आणि सैवक्कू शंकर यांना ‘अन्यायाने फाशी दिल्याचा’ उल्लेख असून त्यामुळे हे प्रकरण अधिक संवेदनशील मानले जात आहे. पोलिस सायबर सेल आणि विशेष पथक ईमेल पाठवणाऱ्याचा माग काढण्यासाठी कार्यरत आहेत.

Bomb Threat to Mumbai Airport and Taj Hotel

मुंबईला मिळालेल्या धमकीचा काही संबंध नुकत्याच जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याशी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये हवाई कारवाई करत अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते.

सध्या मुंबईतील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली असून नागरिकांनी शांतता आणि सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

[emoji_reactions]

Mumbai Crime Maharashtra Marathi News

Join WhatsApp

Join Now