Santosh Deshmukh । मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाने आता वेगळे वळण घेतल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. यामुळे राजकीय वातावरण आणखी पेटू शकते. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांच्या अटकेसाठी आता मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. (Santosh Deshmukh Murder Case)
त्यांनी याप्रकरणातील मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी, या मागणीसाठी सामूहिक जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे. विशेष म्हणजे या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्या आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील फरार आरोपी, मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा आणि त्यांना फाशीची शिक्षा द्या. पोलीस निरीक्षक महाजन यांच्यावर कारवाई करा, अशी देखील मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
यावेळी एका आंदोलक महिलेची प्रकृती बिघडल्याचे समोर आले. त्या महिलेला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ग्रामस्थांनी मस्साजोग शिवारात उतरुन सामूहिक जल समाधी आंदोलन केले. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात गावातील महिला, लहान मुलांचा सहभाग होता.
Santosh Deshmukh Murder case villagers protest
दरम्यान, येत्या दहा दिवसात फरार आरोपींना अटक करण्यात येईल. सध्या त्या दृष्टीने तपास सुरू आहे. तसेच गावकऱ्यांना पोलीस संरक्षण आणि कुटुंबियांना वैयक्तिक संरक्षण देण्यात आले आहे. एसआयटीच्या बाबतीत शासनाने जी आर काढला असून त्याबाबत बसवराज तेली हे आयपीएस अधिकारी DIG रेजंचे अधिकारी आहेत त्यांची प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती बीड पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी यावेळी दिली.
महत्त्वाच्या बातम्या :