Walmik Karad Case । संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणी काल न्यायालयाने आरोपी वाल्मिक कराडला 15 दिवसांची सीआयडी कोठडी देण्याचा निर्णय घेतला आहे. वाल्मिक कराडला (Walmik Karad) बुधवारी रात्री दीड वाजता केज न्यायालयातून बीड शहर पोलीस ठाण्यात त्याला आणण्यात आले होते. अशातच आता याप्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे.
केज न्यायालयातून बीड शहर पोलीस ठाण्यात त्याला आणलयानंतर वैद्यकीय पथकाने तपासणी केली असता त्याला रात्री श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्याने पोलिसांकडे तक्रार केली. त्याची प्रकृती खालावली असल्याची माहिती समोर आली आहे. सीआयडीच्या कोठडीत त्याची शुगर वाढली असल्याने त्याला डॉक्टरांनी ऑक्सिजन लावले.
त्यानंतर त्याला बरे वाटले. सीआयडीचे एसपी बीड शहर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी दाखल झाले असून आता त्याची सीआयडीकडून सखोल चौकशी केली जात आहे. दरम्यान, वाल्मिक कराड घटना घडल्यापासून फरार होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पोलिसांना त्याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले होते.
Santosh Deshmukh murder case update
दरम्यान, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. जरी या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला अटक झाली असली तरी अजूनही तीन आरोपी फरार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच या आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही तर मराठे रस्त्यावर येतील,” असा गर्भित इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. (Maratha strike)
महत्त्वाच्या बातम्या :