Nitesh Rane | “केरळ हा मिनी पाकिस्तान आहे, त्यामुळेच राहुल गांधी आणि त्यांची बहीण प्रियंका गांधी तेथे विजयी होतात, असे लोक त्यांना खासदार बनवण्यासाठी मतदान करतात, राहुल गांधींना आणि प्रियंका गांधींना अतिरेकी मतदान करतात. अतिरेकींना धरून ते खासदार झालेत”, असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं होतं.
त्यांच्या या वक्तव्याचे राजकीय वर्तुळात देखील पडसाद उमटलेले पाहायला मिळाले. नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर केरळच्या मुख्यमंत्र्यांकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. केरळचा मिनी पाकिस्तान म्हणून उल्लेख करणे निषेधार्ह असल्याचं ते म्हणाले.
“केरळ धर्मनिरपेक्षता, सांप्रदायिक मित्रत्वाचा बालेकिल्ला आहे. त्या केरळच्या विरोधात संघ परिवाराने आखलेल्या द्वेषपूर्ण मोहिमांचे असे वक्तृत्व प्रतिबिंबित करते. केरळवरील या घृणास्पद हल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो”, असे म्हणत नितेश राणे यांच्या वक्तव्यावर केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी निषेध व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या :