🕒 1 min read
Chandrashekhar Bawankule | लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत बारामतीमधून पवार विरुद्ध पवार असा सामना रंगल्याचे चित्र पाहायला मिळाले. थोरले पवार आणि अजितदादांचे ताणलेले संबंध सर्वांनी जवळून पाहिले. पण 12 डिसेंबर रोजी शरद पवार यांच्या वाढदिवसाला अजितदादांनी हजर राहत शुभेच्छा दिल्या. तेव्हा दोन पक्ष एकत्र येण्याची चर्चा रंगली होती.
अशातच आता अजितदादांच्या आई आशाताई पवार नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पंढरपुरात आल्या. त्यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले. पुजा केली. यावेळी त्यांनी सर्व वाद मिटून पवार कुटुंब गुण्यागोविंदानं नांदू दे, असं साकडं विठ्ठलाला घातलं आहे.
यानंतर अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवाळ यांनी “जसं बजरंगाच्या छातीत प्रभू राम दिसतील, तर माझ्या छातीत शरद पवार आहेत”, असं वक्तव्य केलं. लागोपाठ केल्या जाणाऱ्या या वक्तव्यांमुळं आता अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र येणार का?, या चर्चांना उधाण आलं आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केलं आहे.
“शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्यास भाजपाची ना असण्याचे काही कारण नाही”, असे बावनकुळे म्हणाले आहेत. “शरद पवार आणि अजित पवार यांच्याबद्दलचा निर्णय त्या दोघांनीच घ्यायचा आहे. त्या पक्षाने आणि त्यांच्या नेत्यांनी निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे त्यांच्या निर्णयात मी काही बोलणं योग्य नाही”, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Santosh Deshmukh हत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर! सीआयडीने तीन लोकांना…
- Ileana D’Cruz । बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दुसऱ्यांदा होणार आई, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच दिली गोड बातमी
- Ajit Pawar | शरद पवारांना भेटून लोटांगण घालून पाया पडणार; अजित पवार गटाच्या नेत्याचे मोठं विधान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










