🕒 1 min read
Ileana D’Cruz । आजपासून नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. अनेकांनी या दिवशी संकल्प करत दिवसाची सुरुवात केली आहे. अशातच बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दुसऱ्यांदा आई होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
अभिनेत्री इलियाना डिक्रूझने (Ileana D’Cruz) आपल्या सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये ती प्रेग्नेंसी किट दाखवताना दिसत आहे. या व्हिडिओनंतर इलियाना दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे.
अभिनेत्रीने व्हिडिओमध्ये जानेवारी ते डिसेंबरपर्यंत झलक दाखवली आहे. यात इलियाना भावूक होऊन कॅमेऱ्याकडे प्रेग्नेंसी किट टेस्ट करत असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रेम.,शांतता, दया, हे सर्व होईल आणि 2025 मध्ये आणखी होईल अशी अपेक्षा आहे, असं म्हणत इलियानाने व्हिडिओ शेअर केला आहे.
Ileana D’Cruz Pregnant
दरम्यान, इलियाना डिक्रूझ आणि मायकल डोलनने ऑगस्ट 2023 मध्ये त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले. आणि त्याचे नाव ‘कोआ’ असे ठेवले. यावर्षी, या जोडप्याने त्यांच्या मुलाचा पहिला वाढदिवस साजरा केला. इलियानाने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहे. इलियाना डिक्रूझच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास ती लवकरच विहान सामतसोबत एका टीव्ही मालिकेत दिसणार आहे. चाहते या मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
- Ajit Pawar | शरद पवारांना भेटून लोटांगण घालून पाया पडणार; अजित पवार गटाच्या नेत्याचे मोठं विधान
- राज्य सरकारच्या निर्णयामुळे Santosh Deshmukh हत्या प्रकरणाला वेगळे वळण
- “बजरंगाच्या छातीत प्रभू राम दिसतील, तसं माझ्या छातीत शरद पवार”; Ajit Pawar गटाच्या नेत्याचं वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










