Share

राज्य सरकारच्या निर्णयामुळे Santosh Deshmukh हत्या प्रकरणाला वेगळे वळण

by MHD
Santosh Deshmukh | govt give big decision

Santosh Deshmukh । संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. अशातच आता या प्रकरणाला गती यावी यासाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. (Santosh Deshmukh Murder Case)

राज्य सरकारने संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आयपीएस बसवराज तेली, पोलीस उपमहानिरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा, सीआयडी पुणे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन केले आहे. या विशेष तपास पथकात पोलीस उपअधीक्षक अनिल गुजर, सपोनि विजयसिंग जोनवाल, पीएसआय महेश विघ्ने आणि पीएसआय आनंद शंकर शिंदे, सहाय्यक पीएसआय तुळशीराम जगताप यांच्याशिवाय इतर पोलीस कर्मचारी आहेत.

संतोष देशमुख यांच्या प्रकरणात अपहरण आणि हत्या, दोन कोटी रुपयांची खंडणी, एट्रॉसिटी आणि मारहाण अशा गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून यात पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. वाल्मीक कराड याच्याशिवाय चार गुन्ह्यात 9 संशियत आहेत. यापैकी चार जण अद्याप फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे.

माध्यमांशी बोलताना आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी बीड प्रकरणातील छोटे-मोठे आका यांची नावे स्पष्टपणे उघड केली आहे. “बीडच्या प्रकरणातील मोठे आका म्हणजे धनंजय मुंडे (Dhanajay Munde) होय. छोटे आका म्हणजे वाल्मिक आण्णा (Walmik Karad). या आकानं जर मोठ्या आकाला फोन केला असेल आणि जर मोठ्या आकानं जर आदेश दिला असेल की असं करा, तसं करा असं मला वाटतं नाही. पण समजा असं केलं असेल तर मोठे आका अडचणीत येतील,” असा दावा धस यांनी केला आहे.

Santosh Deshmukh murder case government decision

दरम्यान, या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्याही राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येमागे वाल्मिक कराडचा हात असल्याचा आरोप देखील सातत्याने केला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Santosh Deshmukh case, four crimes have been registered, namely kidnapping and murder, extortion of two crore rupees, atrocity and assault.

Maharashtra Crime Marathi News

Join WhatsApp

Join Now