Share

Suresh Dhas । मोठी बातमी! “बीड प्रकरणातील छोटे-मोठे आका…” ; सुरेश धस स्पष्टच बोलले

by MHD
Suresh Dhas | Santosh Deshmukh Case

Suresh Dhas । बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरण दिवसेंदिवस वेगळे वळण घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. आमदार सुरेश धस यांनी एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. (Santosh Deshmukh Murder Case)

माध्यमांशी बोलताना सुरेश धस यांनी बीड प्रकरणातील छोटे-मोठे आका यांची नावे स्पष्टपणे उघड केली आहे. “बीडच्या प्रकरणातील मोठे आका म्हणजे धनंजय मुंडे (Dhanajay Munde) होय. छोटे आका म्हणजे वाल्मिक आण्णा (Walmik Karad). या आकानं जर मोठ्या आकाला फोन केला असेल आणि जर मोठ्या आकानं जर आदेश दिला असेल की असं करा, तसं करा असं मला वाटतं नाही. पण समजा असं केलं असेल तर मोठे आका अडचणीत येतील,” असा दावा धस यांनी केला आहे.

Suresh Dhas on Santosh Deshmukh Murder Case

नुकतीच सुरेश धस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची भेट घेत कराडच्या कारनाम्याचा पाढाच वाचायला सुरुवात केली. बोलताना धस म्हणाले की, या प्रकरणात सुदर्शन घुले हा प्रमुख आरोपी आहे. यात त्याचा आणि प्रतीक घुले या दोघांचा सहभाग जास्त असून वाल्मीक कराड शरण आला आहे. तो 100 टक्के 120 ब मध्ये आहे, पण माझा अंदाज आहे की जर त्यांनी व्हिडिओ पाहिल्यास तर तो पण 302 मध्ये येऊ शकतो,” असा दावा धस यांनी केला होता.

महत्त्वाच्या बातम्या :

Suresh Dhas has clearly revealed the names of minor and major in the Beed case. This may once again inflame the political atmosphere.

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now