Walmik Karad । संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणी संपूर्ण राज्याचे लक्ष बीडकडे लागले आहे. याप्रकरणी दररोज नवनवीन अपडेट समोर येत आहे. महत्त्वाचे म्हणजे अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याचीही मागणी होऊ लागली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच पेटले असल्याचे पाहायला मिळत आहे.
काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार (Vijay Vaddetiwar) यांनी माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे यांचे नाव न घेता पोलीस दलात असणाऱ्या एका मोठ्या अधिकाऱ्याचा हवाला देऊन दावा केला आहे. बोलताना ते म्हणाले की, “मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काऊटर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे माझी पोलिसांना विनंती आहे की त्याचा एन्काऊंटर करु नका. जर असे झाले तर पुरावे नष्ट होऊ शकतात.”
पुढे ते म्हणाले की, “राज्य सरकारला कराडवर निष्पक्ष कारवाई करायची आहे का? जर कारवाई करायची असेल तर बीड जिल्ह्याच्या बाहेर चौकशी आणि तपास करावा. ज्याने पोलिसांना आतापर्यंत आपल्या धाकात ठेवले ते त्याची चौकशी करणार की सेवा? असे खडे बोलही बीड पोलीस ठाण्यात पाच पलंग आणल्याने वड्डेटीवार यांनी सुनावले आहे.
Santosh Deshmukh murder case
दरम्यान, पोलीस ठाण्यात आलेल्या पलंगाच्या बातम्या येताच तातडीने पोलिसांनी याबाबत खुलासा केला आहे. बीड पोलीस ठाण्यात पलंग नाही तर पोलीस शिपायांसाठी कॉट आणले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :