Dhananjay Munde । मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची हत्या झाल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष बीड जिल्ह्याकडे लागले आहे. याप्रकरणी मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडने (Walmik Karad) सीआयडीसमोर आत्मसमर्पण केले आहे. यामुळे पोलीस तपासाला वेग आला आहे. (Santosh Deshmukh murder case)
वाल्मिक कराडला अटक केल्यानंतर अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. यावर अखेर मुंडे यांनी आपलं मौन सोडले आहे. “संतोष देशमुख प्रकरणासोबत माझा काहीही संबंध नाही. त्यामुळे मी राजीनामा का द्यावा? मला विनाकारण लक्ष्य केलं जात आहे. याउलट संतोष देशमुख प्रकरण हे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवलं गेलं पाहिजे अशी मागणी माझीच होती,” असे मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.
Dhananjay Munde on Walmik Karad Arrest
दरम्यान, “बीड जिल्ह्यातील या घटनेवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचं मौन पाहता धनंजय मुंडेंची विकेट काढली जाऊ शकते आणि त्यांच्याऐवजी छगन भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाईल. छगन भुजबळ यांना कदाचित वेट अँड वॉचची भूमिका ठेवावी लागू शकते. नाहीतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे दुसरा पर्याय असेल. कारण भेटीमध्ये काहीतरी ठरलं असेल,” असे वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Walmik Karad । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट! सुदर्शन घुले देश सोडून फरार? समोर आली धक्कादायक माहिती
- Jio । स्वस्तात मस्त! कमी किमतीत मिळेल हायस्पीड 5G डेटासह अनेक जबरदस्त फायदे, त्वरित करा रिचार्ज
- Marco Box Office Collection । तुम्हीही पाहिलात का ‘हा’ सिनेमा? ज्याने केलीय ‘पुष्पा 2’ पेक्षाही बक्कळ कमाई