Walmik Karad । मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येनंतर राज्याचे राजकीय वातावरण पेटलं आहे. यावरून अनेक ठिकाणी आंदोलन आणि निषेध मोर्चे काढले जात असून मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडने सीआयडीसमोर आत्मसमर्पण केले आहे. यामुळे पोलीस तपासाला वेग आला आहे, असे बोललं जात आहे. (Santosh Deshmukh murder case)
या आरोपींना पकडण्यासाठी सीआयडीची सात पथके संपूर्ण देशभर रवाना झाली आहेत. असे असले तरी मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा पत्ता नाही. त्यामुळे आता सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) देश सोडून गेला का? असा संशय व्यक्त केला जात आहे. सुदर्शन घुले हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी एका गुन्ह्यात फरार असताना नेपाळला गेल्याची माहिती आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा तो नेपाळला जाऊ शकतो का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
Sudarshan Ghule absconding
राज्य सरकारने संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आयपीएस बसवराज तेली, पोलीस उपमहानिरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा, सीआयडी पुणे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन केले आहे. या विशेष तपास पथकात पोलीस उपअधीक्षक अनिल गुजर, सपोनि विजयसिंग जोनवाल, पीएसआय महेश विघ्ने आणि पीएसआय आनंद शंकर शिंदे, सहाय्यक पीएसआय तुळशीराम जगताप यांच्याशिवाय इतर पोलीस कर्मचारी आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
- Maharashtra Politics । धनंजय मुंडेंचा पत्ता कट करून भुजबळांना मिळणार मंत्रिमंडळात स्थान? बड्या आमदाराचा दावा
- Jio । स्वस्तात मस्त! कमी किमतीत मिळेल हायस्पीड 5G डेटासह अनेक जबरदस्त फायदे, त्वरित करा रिचार्ज
- Marco Box Office Collection । तुम्हीही पाहिलात का ‘हा’ सिनेमा? ज्याने केलीय ‘पुष्पा 2’ पेक्षाही बक्कळ कमाई