Walmik Karad ला पोलिसांची मदत, संतोष देशमुख यांच्या भावाचा गंभीर आरोप

Dhananjay Dekmukh has claimed that someone who came to meet Walmik Karad in CID custody showed him the photo of Sudarshan Ghule, who is absconding in the case.

by MHD

Published On: 

Walmik Karad | Dhanjay Deshmukh on Walmik Karad

Walmik Karad । सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे काही मारेकरी अजूनही मोकाट आहेत. कालच केज पोलिसांनी प्रसिद्धीपत्रक जारी करत सुदर्शन घुले (Sudarshan Ghule), कृष्णा आंधळे, सुधीर सांगळेला फरार घोषित केले आहे. फरार आरोपींना पकडून देणा-यास पोलिसांनी बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

सीआयडीच्या कोठडीत कराडला भेटायला आलेल्या एकाने आपल्याला या प्रकरणातील फरारी सुदर्शन घुलेचा फोटो दाखविला, असा दावा धनंजय देखमुख (Dhanjay Deshmukh) यांनी केला आहे. याबाबत धनंजय देशमुख यांनी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. महत्त्वाचे म्हणजे संबंधित व्यक्तिने महिला पोलिस कर्मचाऱ्याशी वाद घातला आहे.

काही पोलिस कर्मचाऱ्यांना आपण सीआयडीसोबत असल्याचे सांगितले, तर काही कर्मचाऱ्यांना सीआयडीचे चालक असल्याचे सांगितले. पण त्याचे बालाजी तांदळे असे नाव आहे. महिला कर्मचाऱ्यासोबत हुज्जत घातल्याचे सांगत असताना येथील पोलिस अधिकारी दराडे यांनी देशमुख व श्रीमती रेडेकर यांनाच आवाज कमी करा, असा दम भरला.

Dhanjay Deshmukh on Walmik Karad

त्यानंतर त्याला एका वेगळ्या खोलीत नेऊन बसवले. गुन्ह्यानंतर कराड 21 दिवस फरार होता. सर्व यंत्रणा मागे आणि शासनाच्या नावाने शंख वाजत असताना त्याला त्याच्या काही समर्थकांनी फरारी राहण्यासाठी वाहन, पैसे, नियेाजन, संपर्क अशी मदत केली. आता कोठडीत असतानाही त्याच्यासोबत काहींचा वावर आहे असे समोर येत आहे, असा दावा देशमुख यांनी केला आहे.

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
byMHD

Journalist at Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही