Suresh Dhas । सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणाने एक नवीन वळण घेतले आहे. पोलिसांनी आज दोन आरोपींना पुण्यातून ताब्यात घेतले आहे. यामुळे या प्रकरणाच्या चौकशीला वेग येईल, असे बोलले जात आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी याबाबत एक मोठे वक्तव्य केले आहे. (Santosh Deshmukh murder case update)
SIT पथकात वाल्मिक कराड यांचे जवळचे अधिकारी असल्याचा आरोप होत असून याबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांच्या बदल्या करून आणून अतिशय त्याच्या अतिशय जवळचे लोक या लिस्टमध्ये आले आहेत. पण आता देवेंद्र फडणवीस यामध्ये बदल करणार आहेत. संतोष देशमुख हत्याप्रकरणी ज्या आरोपींनी मदत केली, ते देखील सह आरोपी असून ज्यांनी या आरोपींना मदत केली ते देखील सहआरोपी म्हणून आत जाऊ शकतात,” असा दावा सुरेश धस यांनी केला आहे.
संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करुन त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी आज परभणीमध्ये सर्वपक्षीय, सर्वजातीय, सर्वधर्मीय मूक मोर्चाचे आयोजन केले आहे. परभणीच्या नूतन महाविद्यालय येथून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत हा मोर्चा असणार आहे. यात सुरेश धस हे देखील सहभागी होणार आहेत.
Suresh Dhas on Santosh Deshmukh murder case
त्यापूर्वी सुरेश धस यांनी माध्यमांशी संवाद साधला. संतोष देशमुख हत्येप्रकरणी ज्यांनी आरोपींना मदत केली ते सहआरोपी म्हणून जेलमध्ये जातील, असा आरोप धस यांनी केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :