Bacchu Kadu । मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्य सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेच्या केंद्रस्थानी येत आहे. अशातच आता माजी आमदार बच्चू कडू यांनी राजीनामा दिला आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
बच्चू कडू यांच्या प्रयत्नांमुळं देशात पहिल्यांदाच महाराष्ट्रात दिव्यांगांच्या समस्यांवर प्रभावीपणे काम करण्यासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना झाली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री पदावर असताना त्यांनी याला मंजुरी दिली होती. परंतु अजूनही या मंत्रालयचं काम अद्याप सुरु झाले नसल्याने कडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
“भारतातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय महाराष्ट्रात निर्माण केल्याबद्दल एकनाथ शिंदे यांचं मनापासून आभार. परंतू अद्यापपर्यंत दिव्यांगाच्या सर्वांगीण विकासासाठी मंत्रालयाचं काम सुरू झालेलं नाही. पदावर राहुन हे काम होणार अशी शक्यता मला दिसत नाही. त्यामुळं दिव्यांगासोबत बेईमानी करणं मला शक्य नाही.
त्यामुळं मी माझ्या दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियानाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. हा राजीनामा मंजूर करुन सहकार्य करावं तसंच मला असलेली सुरक्षा सुध्दा काढून टाकावी व कुठलीही सुरक्षा ठेवण्यात येऊ नये, असे कडू यांनी पत्रात म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Dhananjay Munde यांच्या अडचणी संपता संपेना! पक्षाच्या ‘या’ नेत्यांनी केली राजीनाम्याची मागणी
- Flipkart Sale । त्वरा करा! iPhone 16 सह स्वस्तात मिळताहेत ‘हे’ फोन, पहा हजारोंची बचत करणारी ऑफर
- Beed Guardian Minister । अजितदादांकडे असणार दोन जिल्ह्याचं पालकमंत्रीपद? भाजपच्या बड्या नेत्यानं अखेर सांगूनच टाकलं