Santosh Deshmukh । सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणाने एक नवीन वळण घेतले आहे. पोलिसांनी आज दोन आरोपींना पुण्यातून ताब्यात घेतले आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या ( Santosh Deshmukh Murder case ) प्रकरणातील दोन आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक केल्याची माहिती आहे. मात्र आरोपी कृष्णा आंधळे अजून फरार आहे.
31 डिसेंबरला वाल्मिक कराड पोलिसांना सरेंडर झाला. पण मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह तीन जण फरार होते. त्यापैकी दोन आरोपींना पकडण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. यावरून संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh ) यांनी संशय व्यक्त करत काही सवाल उपस्थित केले आहेत.
“पुण्यातून सगळे सापडले आहेत म्हणजे त्यांना कोणी आश्रय दिला? हे चौकशीतून समोर येईल. हे सराईत गुन्हेगार आहेत. महाराष्ट्रापासून लपून वीस पंचवीस दिवस राहतात. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन शिक्षा झाली पाहिजे, नाहीतर माझ्या कुटुंबाचा आणि गावाचा आधार असलेला, आमच्या सर्वांच्या आदर्श असलेल्या माझ्या भावाला न्याय मिळणार नाही”, असं धनंजय देशमुख म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या :