Share

Manoj Jarange Patil | “यांच्या बापाचा बाप आला, तरी आम्ही…”; संतोष देशमुख हत्येप्रकरणी मनोज जरांगे आक्रमक 

Manoj Jarange Patil | "यांच्या बापाचा बाप आला, तरी आम्ही..."; संतोष देशमुख हत्येप्रकरणी मनोज जरांगे आक्रमक 

Manoj Jarange Patil | बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख ( Santosh Deshmukh ) यांची ९ डिसेंबर रोजी हत्या झाली. हत्येला २५ दिवस होऊनही अद्याप मारेकऱ्यांना अटक झालेली नव्हती. यानंतर आज सकाळी मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळेला अटक केल्याची माहिती समोर येत आहे.

सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे हत्या झाल्यानंतर फरार झाले होते. त्यांना पकडण्यासाठी सीआयडीने प्रसिद्धीपत्रक जारी करत त्यांना फरार घोषित केले होते. त्यानंतर आज दोघांना अटक झाली आहे. पुण्यातून या दोघांना ताब्यात घेण्यात आलं असून अजून एक कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. या अटकेनंतर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील ( Manoj Jarange Patil )यांनी प्रतिक्रिया देत सरकारला इशारा दिला आहे.

हे प्रकरण थंड करुन दाबण्याचा प्रयत्न होतोय का? यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “यांच्या बापाला थंड होत नाही. यांच्या बापाचा बाप आला, तरी आम्ही मॅटर दाबू देणार नाही. गृहमंत्रालयाला एकच सांगणं आहे की, लपवून ठेवणाऱ्यांना सुद्धा सोडू नका. ते सुद्धा खुनाला जबाबदार आहेत. लेकरु गेलं याचं दु:खच नाही. गुन्हेगारांना लपवून ठेवणं ही भूमिका चांगली नाही.”

सगळ्या आरोपींची नार्को टेस्ट करण्याची मागणी मनोज जरांगेंनी केली आहे. “आता एक काम सरकारकडून होणं गरजेचं आहे. खंडणीच्या आणि हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी दोघांची नार्को टेस्ट झाली पाहिजे. सरकारने यात अजिबात हयगय करु नये. कारण यामध्ये मोठं रॅकेट आहे. पुण्यातून सगळ्यांना पकडलं जातय याचा अर्थ सरकार आणि सरकारमधील मंत्र्याच प्रचंड राजकीय पाठबळ आहे. यांना कोण संभाळतय, त्यांना सुद्धा सरकारने अटक करावी” अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या :

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख ( Santosh Deshmukh ) यांच्या हत्येप्रकरणी आज दोघांना अटक झाली आहे. या अटकेनंतर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील ( Manoj Jarange Patil )यांनी प्रतिक्रिया देत सरकारला इशारा दिला आहे.

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now