Share

Suresh Dhas । “करुणा मुंडेंच्या वाहनात शस्त्र ठेवणारी ‘ती’ व्यक्ती कोण?”; बड्या नेत्याने केला खळबळजनक खुलासा

Suresh Dhas । संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणी पोलिसांनी वाल्मिक कराड यांच्यासह आज आणखी दोन आरोपींना पुण्यातून ताब्यात घेतले आहे. यामुळं या प्रकरणाचा तपास आणखी वेगाने होईल, असे बोलले जात आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी एक मोठा खुलासा केला आहे. “करुणा मुंडे (Karuna Munde) यांच्या वाहनात पिस्तूल ठेवणारी ती व्यक्ती पोलिस दलातील होती. … Read more

by MHD

Published On: 

Suresh Dhas । "करुणा मुंडेंच्या वाहनात शस्त्र ठेवणारी 'ती' व्यक्ती कोण?"; बड्या नेत्याने केला खळबळजनक खुलासा

Suresh Dhas । संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणी पोलिसांनी वाल्मिक कराड यांच्यासह आज आणखी दोन आरोपींना पुण्यातून ताब्यात घेतले आहे. यामुळं या प्रकरणाचा तपास आणखी वेगाने होईल, असे बोलले जात आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी एक मोठा खुलासा केला आहे.

“करुणा मुंडे (Karuna Munde) यांच्या वाहनात पिस्तूल ठेवणारी ती व्यक्ती पोलिस दलातील होती. त्याने कोणाच्या सांगण्यावरून काम केले, त्याचे नाव मला माहिती आहे. लवकरच आपण ते नाव पोलिस अधीक्षकांना सांगणार आहे,” असा दावा धस यांनी केला आहे. यामुळे धस कोणाचे नाव पोलिसांना सांगणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Suresh Dhas on Karuna Munde

“संतोष देशमुख हत्याप्रकरणी ज्या आरोपींनी मदत केली, ते देखील सह आरोपी असून ज्यांनी या आरोपींना मदत केली ते देखील सहआरोपी म्हणून आत जाऊ शकतात. SIT पथकात वाल्मिक कराड यांचे जवळचे अधिकारी असल्याचा आरोप होत असून याबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांच्या बदल्या करून आणून अतिशय त्याच्या अतिशय जवळचे लोक या लिस्टमध्ये आले आहेत,” असेही धस यांनी स्पष्ट केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही