Share

Walmik Karad ने वापरलेल्या गाडीमालकाकडून स्पष्टीकरण; म्हणाले, “अजितदादांच्या दौऱ्यात मी होतो, पण..’

Walmik Karad ने वापरलेल्या गाडीमालकाकडून स्पष्टीकरण; म्हणाले, "अजितदादांच्या दौऱ्यात मी होतो, पण..'

Walmik Karad | संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे अपहरण करून हत्या प्रकरणाचा ठपका असलेला वाल्मिक कराड (Walmik karad) 31 डिसेंबर रोजी पुण्यात सीआयडीला शरण गेले. यादरम्यान वाल्मिक कराड ज्या गाडीत सीआयडीला शरण गेले त्या गाडीवरून राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

तीच गाडी उपमुख्यमंत्री अजित पवार ज्यावेळी देशमुख कुटुंबीयांच्या भेटीला आले होते त्याच गाड्यांच्या ताफ्यात असल्याचा आरोप केला जात आहे. ज्याच्या नावे ही गाडी आहे ते शिवलिंग मोराळे (Shivling Morale) यांनी माध्यमासमोर येऊन याबाबतची स्पष्टता दिली आहे. “आरोप सिद्ध झाला तर माझ्यासारखा कार्यकर्ता भर चौकात फाशी घेईल”, असं वक्तव्य शिवलिंग मोराळे यांनी केलं आहे. त्याबरोबरच जे आरोप केले जात आहेत ते अतिशय चुकीचे असल्याचं म्हणत त्यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.

“मी वाल्मिक कराड यांचा कार्यकर्ता आहे. मला ज्यावेळी माहित झाले की, कराड सरेंडर होणार आहेत त्यावेळी आम्ही पुणे गाठले. मी सीआयडी ऑफिस परिसरात असताना वाल्मिक कराड एका छोट्या गाडीत आले होते. मात्र त्यांनी मला पाहिल्यानंतर त्यांनी मला हात केला आणि त्यांनी मला माझ्या गाडीत सीआयडी ऑफिसला सोडायला सांगितले. त्यांना त्या ठिकाणी सोडले आणि मी निघून आलो”, असं  स्पष्टीकरण मोराळे यांनी दिलं आहे.

“ज्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीडमध्ये आले त्यावेळी तिथे मी माझ्या कर्मचाऱ्यांना भेटायला गेलो होतो. मी जरी त्यांच्या दौऱ्यात असलो तरी मी तिथे माझ्या मित्राच्या गाडीत गेलो होतो. त्याबाबतचे लोकेशन सादर केले आहे. मी नार्को टेस्ट करायला देखील तयार आहे,” असे शिवलिंग मोराळे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या :

वाल्मिक कराड ( Walmik Karad ) ज्या गाडीत सीआयडीला शरण गेले त्या गाडीवरून राजकीय वर्तुळात चर्चा आहे. ज्याच्या नावे ही गाडी आहे ते शिवलिंग मोराळे (Shivling Morale) यांनी माध्यमासमोर येऊन याबाबतची स्पष्टता दिली आहे. 

Maharashtra Marathi News Politics Pune

Join WhatsApp

Join Now